PCMC : शहरात आजही शेकडो होर्डिंग अनधिकृत, कारवाईचा केवळ दिखावूपणा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चौकाचौकात (PCMC) अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे. होर्डिंगवरती कारवाई करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होर्डिंग चालकाला मदत केली जात आहे. कारवाईचा केवळ दिखावूपणा केला जात असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला.

आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्टया निवेदनात काटे यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील चौका-चौकातील व रस्त्याच्या बाजूला आजही शेकडो जाहिरात होर्डिंग उभी आहेत. अशी धोकादायक असणारे आणि कोसळलेले जाहिरातीचे होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट केले का? याचीसुद्धा सविस्तर माहिती जनतेसमोर आली पाहिजे.

SSC Result 2023 : दहावीचा राज्याचा निकाल 93.83 टक्के; बारावी प्रमाणे दहावीतही राज्यात कोकण विभाग प्रथम

आता उभ्या असणाऱ्या होर्डिंगला परवानगी दिली असल्यास अथवा संबंधितांनी परवानगी मागितली असल्यास परवानगीच्या प्रस्तावाप्रमाणेच होर्डिंग उभारले आहे का ? होर्डिंग अनाधिकृत असल्यास त्याबाबत कोणती कारवाई केली. तसेच कोणतीही कारवाई केली गेली नसल्यास त्याबाबत कोण जबाबदार कोण ? अशा अनेक (PCMC) प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी तातडीने सखोल चौकशी अहवाल जनतेसमोर मांडावा.

SSC Result 2023 : दहावीचा राज्याचा निकाल 93.83 टक्के; बारावी प्रमाणे दहावीतही राज्यात कोकण विभाग प्रथम

शहरात अवकाळी पावसामुळे किवळे येथे होर्डिंग दुर्घटना घडली. यामध्ये 5 व्यक्तींना प्राण गमवावा लागला होता. त्यानंतर 4 दिवसापूर्वी हिंजवडी परिसरात ही होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे शहरात अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणी वरती आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून अनेक भागात कारवाईचा केवळ फार्स केला जातो आहे. आजही शहरात अनेक भागात धोकादायक पद्धतीने होर्डिंग जैसे थे आहेत. यावरती महापालिका कधी कारवाई करणार की नागरिकांच्या जीवाशी खेळणार असा प्रश्न काटे यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.