PCMC : रस्त्यावरील बेवारस वाहने जप्त करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज – खराब झालेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्त (PCMC) कराव्यात, रस्त्यांवरील बेवारस वाहने तसेच अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावीत अशा सूचना वजा तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार जनसंवाद सभा ही नागरिक आणि महापालिका यांच्यातील समन्वयक ठरत असून विविध प्रश्न, सूचना, तक्रारींच्या माध्यमातून महापालिकेची ध्येय धोरणे, निर्णयांमध्ये नागरी सहभाग वाढविण्यासाठी देखील महत्वाची भूमिका बजावत आहे.

IND VS AUS : सलग चौथ्यांदा बॉर्डर गावसकर मालिका भारतीय संघाने जिंकली

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत 45 नागरिकांनी सहभाग घेऊनतक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 11, 12, 4, 3, 1, 3, 5, 6 नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी (PCMC) मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या जनसंवाद सभेस क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, विजयकुमार थोरात उपस्थित होते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात यावेत, जुने झालेल्या सार्वजनिक शौचालयांचे नुतनीकरण करण्यात यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.