PCMC :  महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ताकरातून 810 कोटी तिजोरीत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 810 कोटी रुपयांची कर वसूल केला आहे. (PCMC)  महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 810 कोटींचा टप्पा पार केला असून हा एक माईलस्टोन ठरला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. महानगरपालिका हद्दीत 5 लाख 97 हजार 487 मालमत्ता आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात यापैकी सव्वा चार लाख मालमत्ता धारकांनीच कर भरला आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी 628 कोटींचा कर वसूल केला होता. यंदा कराच्या वसुलीत तब्बल 182 कोटी म्हणजे 35 टक्के अधिक कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.

Pimpri : सोशल मीडियावरील मित्राने केला लैंगिक अत्याचार

यंदा कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ कनेक्शन तोडणे, बड्या थकबाकीदारांची वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, मीम्स सारखी अनोखी स्पर्धा, शहरात वर्दळीचे ठिकाण, मुख्य चौक , रस्ते इ. ठिकाणी होर्डींग्ज व फ्लेक्स द्वारे  जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मिडीया द्वारे चित्रफीत, जनजागृतीसाठी रिक्षाद्वारे लाऊडस्पिकरवर जिंगलद्वारे जाहिरात प्रसिद्धी, कर संवाद अशा माध्यमातून करदात्या थकबाकीदारांमध्ये वेळोवेळी जनजागृती करण्यात आली.

मालमत्ता कर वसुलीसाठी नागरीकांना मालमत्ता कराची बिल ऑनलाईन तसेच कर भरण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.(PCMC) मालमत्ताधारकांचे विविध घटकांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन कर सवलत योजना, थकित कर वसुलीसाठी वेळोवेळी घरभेटी देणे, पत्र देणे, जप्तीपुर्व नोटीसा देण्याची कार्यवाही करण्यात आली.

कार्यालयीन कामकाजातील सुलभता

स्वयंस्फुर्तीने मालमत्ता नोंदीसाठी माझी मिळकत माझी आकारणी योजना. मालमत्ता करातील विविध सवलत योजनांचा लाभ घेणेकामी नागरिकांना अर्ज करणेकामी ऑनलाईन अर्ज करणेची सुविधा.नागरिकांसाठी  मालमत्ता कर थकबाकी नसलेचा दाखला प्राप्त करून घेणेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध.(PCMC)  नागरिकांना ऑनलाईन मालमत्ता हस्तांतरण अर्ज करणेची सुविधा, तसेच सर्व कामकाज ऑनलाईन पध्दतीनेच होत असल्याने वेळेत बचत.  मालमत्तेस मोबाईल क्रमांक जोडणेची सुविधा त्यामुळे सर्व मालमत्तांना तात्काळ संपर्क करणे सोयीस्कर.

मनपा उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना

स्वयंस्फुर्तीने मालमत्ता नोंदीसाठी ‘माझी मिळकत माझी आकारणी’ ही योजना कार्यान्वीत केल्याने उत्पन्न वाढीस मदत. मालमत्ता करातील विविध सवलत योजनाचा आढावा घेऊन एकसूत्रीपणा व जादाच्या सवलती कमी करून सुलभ सवलत योजनांची अंमलबजावणी धोरण ठरविण्यात आले. हस्तांतर फी वसूलीचे समन्यायी सुधारीत धोरण ठरविण्यात येऊन उत्पन्न वाढीचे दृष्टीने चालू बाजारमुल्यावर आधारीत हस्तांतर फी वसुलीचे धोरण कार्यान्वीत केले. त्यामुळेच 810 कोटी कर वसूल करण्यास यश आले असल्याचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

ऐतिहासिक बाबीं ठळकपणे
# महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा आठशे कोटींची मजल
# वर्षभरात वसुलीत तब्बल 35 टक्क्यांनी वाढ.
# तब्बल तेरा हजारांवर मालमत्तांची जप्ती अधिपत्रे जारी.  दहा हजारांची अंमलबजावणी पूर्ण.
# दोन हजारांपेक्षा जास्त मालमत्ता सील.
# विभागाच्या संपूर्ण सेवा ऑनलाईन.
#पहिल्यांदाच सव्वा चार लाखावर मालमत्तांचा थकीत व चालू कर शंभर टक्के वसूल.
# अनधिकृत बांधकाम शास्तीची टांगती तलवार कायमची दूर. अशा मालमत्ताधारकांकडून तब्बल नव्वद टक्के मूळ कर वसूल.

कर वसुलीचा आलेख
वर्ष     वसुल झालेल्या कराची रक्कम
2018-19 :  471 कोटी
2019-20 : 480 कोटी 7
2020-21 : 553 कोटी
2021-22 : 628 कोटी
2022-23  : 810 कोटी

 

शास्ती माफीचा फायदा कुणाला व कसा?

शासनाने 3 मार्च 2023 पर्यंतच्या अवैध बांधकामांचा सरसकट शास्तीकर माफ केला. या निर्णयाचा 31 हजार 311 मालमत्तांना लाभ मिळाला.
यापैकी मुळ कराचा भरणा केलेल्या मालमत्ता धारकांची संख्या:-   23,500
मुळ कराचा भरणा:-  170 कोटी
माफ झालेला शास्ती:-  -280 कोटी

विभागासमोर कोणत्या अडचणी आल्या ?

कर संकलन व कर आकारणी विभागाकडे फक्त 40 टक्के मनुष्यबळ उपलब्ध आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याची ओरड न करता सुक्ष्म नियोजन करून वसुलीसाठी प्रयत्न केले. तसेच चिंचवड पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एक महिना कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यानंतरही वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले.

यावर्षी कर संकलन विभागाने उत्तम कामगिरी बजावली आहे. त्याबद्दल मी कर संकलन विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. पुढच्या आर्थिक वर्षात मी कर संकलन विभागाला एक हजार कोटींचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यासाठी मी विभागाला निरंतर कर वसुली, सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण आणि माहितीचे प्रमाणीकरण अशी त्रिसूत्री आखून दिलेली आहे. पाच कोटीपेक्षा जास्त थकीत असलेल्या थकबाकीदार यांच्यावर (PCMC) माझे वैयक्तिक लक्ष असणार आहे. प्रलंबित कोर्ट प्रकरणांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची मालमत्ता कर प्रणाली ही देशातील सर्वोत्तम प्रणाली बनवण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले.

माझी नियुक्ती झाल्यावर मी मासिक बैठका घेण्यावर भर दिला. आढावा बैठकीत समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. वसुलीसाठी अधिकचे MSF जवान उपलब्ध करून देण्यात आले. नळ कनेक्शन बंद करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे प्लंबर मिळण्याची व्यवस्था केली.(PCMC) यंदा कर संकलन विभागाकडेच पाणीपट्टी वसुलीचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही विभागाच्या वसुलीचे काम प्रभावी पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे. यापुढेही एक हजार कोटींचे उद्दिष्ट गाठले जाईल, यासाठी नियमित आढावा घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त  प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

आठशे कोटींच्या वसुलीचे संपूर्ण श्रेय महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आहे. त्यांनी थकबाकी वसुलीसाठी गेल्या वर्षभरात जे कष्ट घेतले त्याला तोड नाही. अनेक खोटे आरोप, तथ्यहीन तक्रारी होऊनही नाउमेद न होता त्यांनी पालिकेचा विश्वास सार्थ ठरवला. त्यातील निवडक अधिकारी आणि कर्मचारी यांचा माननीय आयुक्त यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात माहिती तंत्रज्ञान विभागाने मोलाचे सहकार्य केले. आमच्या वसुली मोहिमेला प्रसार माध्यमांनी योग्य प्रसिध्दी देऊन सकारात्मक वातावरण तयार केले.(PCMC)त्याचा मोठा फायदा झालेला दिसून येतो. सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी यांनीही विभागाला संपूर्ण सहकार्य केले, त्यांचेही आभार मानले पाहिजेत. येत्या वर्षात एक हजार कोटींच्या लक्ष्याला खात्रीने गवसणी घातली जाणार आहे. माननीय आयुक्त यांनी आखून दिलेल्या त्रिसूत्रीनुसार काम करण्यासाठी आम्ही सारे कटिबद्ध आहोत, असे सहायक आयुक्त  नीलेश देशमुख यांनी सांगितले..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.