PCMC: स्वच्छ सर्वेक्षणाच्या कार्यपद्धतीची ब्रँड अॅम्बेसेडरला दिली माहिती

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षणामध्ये (PCMC) स्थानिक नागरिकांमधून शहराचे नाव देशपातळीवर नेले आहे. अशा नागरिकांमधून कलाकार, डॉक्टर, खेळाडू, शिक्षक व विशेषत: अपंग व ट्रान्सजेन्डर यांची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना स्वच्छ सर्वेक्षणाच्या कार्यपद्धतीची माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर यांनी दिली.

स्वच्छतेचे महत्व, कचरा विलगीकरण, घनकचरा व्यवस्थापन, स्टीचिंग युनिट, नवी दिशा, प्लास्टिक बंदी यांची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना समजावून सांगून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छते विषयक मोहिमेमध्ये ब्रँड अॅम्बेसेडर यांनी वेळेचे नियोजन करुन जवळच्या ठिकाणी वेळोवेळी सहभागी व्हावे. त्यांची भूमिका शुक्रवारी झालेल्या बैठकीत समजावून सागंण्यात आली.

Pimpri News : महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ 8 डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड बंद

शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्यासाठी (PCMC) महापालिका प्रयत्नशील आहे. स्वच्छ भारत अभियान पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राबविण्यात येत आहे. याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्वच्छतेची लोकचळवळ व्यापक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून क्रीडा क्षेत्रातील पूजा शेलार, ज्येष्ठ कलाकार सुरेश डोळस, तृतीयपंथीय शिवान्या पंकजा बोकील, अपंग संवर्गातून संगिता जोशी- काळभोर व मुख्याध्यापक मनोज देवळेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे.

उपआयुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ भारत अभियान समन्वयक विनोद जळक, सर्व ब्रँड अॅम्बेसेडर, केपीएमजी टीम यांची बैठक झाली. स्वच्छाग्रहाचे पेनस्टँड व बॅचेस देऊन स्वागत केले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षणाची कार्यपद्धतीची माहिती चारठाणकर यांनी ब्रँड अॅम्बेसेडरला दिली. ब्रँड अॅम्बेसेडर यांना येणा-या समस्या, त्यांच्या संकल्पना, नवीन उपक्रम, त्यांचे आयोजित कार्यक्रम यांचे महापालिका स्वागत करेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.