PCMC : मोठ्या सोसायटींकडून ओला कचरा घेणे बंद करण्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठाम; तर हाऊसिंग फेडरेशन

एमपीसी न्यूज : मोठ्या सोसायटींकडून 2 ऑक्टोबरपासून (PCMC) ओला कचरा घेणे बंद करण्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठाम, तर पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशन या निर्णयाला विरोध करण्यावर ठाम आहे. पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनच्या शिष्टमंडळाची मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या बैठकीतून हे चित्र समोर आले.

बैठकी विषयी माहिती देताना, पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनचे प्रवक्ता अरुण देशमुख म्हणाले, की आयुक्तांनी सांगितले, की 2 ऑक्टोबरपासून मोठ्या सोसायटीकडून ओला कचरा घेणे महानगरपालिका बंद करणार आहे. केंद्र सरकारच्या 2016 च्या नियमानुसार महानगरपालिका कारवाई करत आहे. हे केंद्र सरकारचे नियम असल्यामुळे त्यांची अंमलबजावणी करावी लागेल.

फेडरेशनच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितले, की सोसायटीमधील सदनिका धारक हे वेळेवर महानगरपालिकेला टॅक्स भरतात. पाणी, रस्ते व आरोग्य सुविधा पुरवणे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. पिण्याचे पाणी टँकर द्वारे घेण्यासाठी एक लाख ते दहा लाख रुपये प्रति महिना खर्च करावा लागतो. रस्त्यांवर खूप खड्डे झालेले आहेत, त्यामुळे नागरिकांना त्यावरून वाहने चालवताना खूप त्रास सहन करावा लागतो. आता महानगरपालिकेच्या निर्णयामुळे त्यांच्या आवारात ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारावी लागेल. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागेल. त्या केंद्राला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर सुद्धा खूप मोठा (PCMC) खर्च करावा लागेल.

Post Payment Bank : पोस्ट विभागाच्या पोस्ट पेमेंट बँकेच्या संचालकपदी विनय गानू यांची नियुक्ती

सोसायट्यांकडे ओला कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी जागा, पैसे व कर्मचारी नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेने सोसायट्यांचा ओला कचरा उचलावा व त्यावर प्रक्रिया करावी. फेडरेशन आपल्या मागणीवर ठाम आहे, की महानगरपालिकेने सोसायट्यांचा ओला कचरा उचलावा व त्यावर प्रक्रिया करावी. त्यामुळे फेडरेशन महानगरपालिकेच्या निर्णयाचा विरोध करत राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.