Pimpri News : पालिकेच्या जिजामाता रुग्णालयास डेंटल एक्स रे मशीन भेट देणार

एमपीसी न्यूज – कै. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ पिंपरी येथील महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयास माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने (Pimpri News) डेंटल एक्स-रे मशीन भेट देण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र महापालिकेचे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे यांना आज (शुक्रवारी) देण्यात आले.

कोरोना काळामध्ये महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटर मार्फत अनेक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले होते. याच काळामध्ये वाघेरे यांच्या वतीने 50 फाऊलर बेड, 4 हाय फ्लो मशीन व 2 व्हेंटी लेटर भेट स्वरुपात देण्यात आले होते.(Pimpri News) महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयामध्ये डेंटल युनिट नसल्याने परिसरातील नागरिकांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये जावे लागत होते. अशा नागरिकांना दंत रोग विषयक उपचारासाठी या मशीनमुळे मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

Pimple Saudagar News : रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

कै. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ 1 डिसेंबर रोजी महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयास ही मशीन भेट स्वरुपात देण्यात येणार आहे, अशी माहिती वाघेरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.