Pimpri News : रोजगार वाढीसाठी महापालिका प्रयत्नशील – प्रदीप जांभळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका लाईट हाऊसच्या माध्यमातून शहरातील विशेषतः गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या युवक – युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, (Pimpri News) यासाठी नेहमीच कार्यशील आहे. युवकांना प्रशिक्षण, समुपदेशन व रोजगार संधी वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि लाईट हाऊस फाऊंडेशनच्या वतीने चालविण्यात येणार्‍या रोजगार प्रशिक्षण केंद्रा मार्फत पिंपरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त चंद्रकांत इंदरकर, रविकिरण घोडके, समाज विकास अधिकारी सुहास बहादरपूरे यांच्यासह लाईट हाऊसचे पदाधिकारी व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Maharashtra : जय जय महाराष्ट्र माझा…हे गीत महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत; सरकारचा निर्णय

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, डिजिटेक सोल्यूशन्स, बजाज ऑटो लि., कृष्ण डायग्नोस्टिक्स, चेतक टेक्नॉलॉजीज लि., स्पेरो हेल्थकेअर इनोव्हेशन्स प्रा. लि., स्पेरो हेल्थकेअर इनोव्हेशन्स प्रा. लि., (Pimpri News) एलएमसी फोर्स प्रायव्हेट लिमिटेड, SBI-Quess Corp, रिलायन्स – SD सेवा, चॅनेल प्ले, मार्कोन लॉगी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, यशस्वी ग्रुप, बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, BSA कॉर्पोरेशन, Big बास्केट, कॅलिबर एचआर, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक यासह विविध कंपन्यांनी सहभाग घेतला. सदर मेळाव्यात लाईट हाऊस मधून कोर्स पूर्ण केलेल्या 150 युवकांनी याचा लाभ घेतला. मेळाव्यात सहभागी कंपन्यांचे महानगरपालिकेच्यावतीने आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.