PCMC : थेरगाव रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ मनोज भावसार यांचे अपघाती निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या(PCMC) थेरगाव रुग्णालयातील वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ मनोज भावसार यांचे रत्नागिरी खेड येथे अपघाती निधन झाले. ते  55 वर्षांचे  होते.

Wakad : वाकड, हिंजवडी परिसरात शस्त्राच्या धाकाने नागरिकांना लुटणारी टोळी जेरबंद

मनोज भावसार हे थेरगाव रुग्णालयात वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. तर, त्यांच्या पत्नी डॉ.शैलजा भावसार या महापालिकेतच जेष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

भावसार कुटूंबीय कोकणातील एका गुरूला भेटण्यासाठी गेले होते. रत्नागिरी खेड येथे मनोज भावसार यांनी चारचाकी पार्क केली . गाडी पार्क करून उभे असताना पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. यात मनोज भावसार यांचे निधन (PCMC) झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.