PCMC : मीना शिंदे यांच्या ‘दीवान – ए – मीना’ ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एमपीसी न्यूज – मराठीतील महिला गझलकार यांपैकी पहिली महिला गझलकार मीना शिंदे यांच्या दीवान – ए – मीना गझल संग्रहाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली 171 मराठी गझला(PCMC) असलेला गझल विश्वात अभिनव ग्रंथ ठरला आहे.

गझलपुष्प प्रकाशन पिंपरी-चिंचवड प्रकाशित, दीवान -ए – मीना या पुस्तकाला प्रस्तावना ज्येष्ठ गजलकार रमण रणदिवे यांनी दिली असून ब्लर्ब पद्मानंदन डॉ.राम पंडित यांनी दिले आहे. या संग्रहाचे प्रकाशन गझलकार रमण रणदिवे यांचे शुभ हस्ते (दि.15) रोजी झाले.याप्रसंगी साहिब ए दीवान शायर डॉ.संदीप गुप्ते,मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित(PCMC) होते.

दीवान – ए – मीना या गझल संग्रहाचा पुस्तक परिचय विविध वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केला आहे. तसेच या पुस्तकाचे परीक्षण डॉ. संदीप गुप्ते मुंबई,लेखक गझलकार बदीऊज्जमा बिराजदार(साबिर सोलापुरी), संजीव देवकर पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे.

मीना शिंदे यांच्या यापूर्वी स्पंदन कविता संग्रह,हृद्गगत गझल संग्रह,गझल रुपेरी व कातर वेळी या दोन सीडी प्रसिद्ध झाल्या आहेत.दीवान -ए – मीना या पुस्तकाला शब्दधन काव्य मंच यांच्या तर्फे गझल सम्राट सुरेश भट गझल पुरस्कार व संस्कृती संवर्धन संस्था यांच्या तर्फे कोहिनूर ए इलाही हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.तसेच श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स,नवी दिल्ली व स्वानंद महिला संस्था.यांचा या संग्रहाला पुरस्कार प्राप्त झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.