PCMC : महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2023-24 या वर्षाचा (PCMC) अर्थसंकल्प मंगळवारी (दि.14)  मार्चला सादर होणार आहे. महापालिकेचा हा 41 वा अर्थसंकल्प आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी महापालिकेवर प्रशासक असलेल्या आयुक्त राजेश पाटील यांनी केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 497 कोटी 2 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावर्षी किती कोटीचे बजेट असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 Pune News : रविवारी जितोचा 17 वा वर्धापन दिन सोहळा

मागील वर्षीसारखीच आस्थापना खर्च, नगररचना, पथदीप व विद्युत व्यवस्था, अग्निशमन, शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालयीन सेवा, दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण योजना व (PCMC) परिवहन यांच्यावरील तरतूद कायम राहील, असे सूत्रांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.