PCMC : महापालिका आयुक्त शेखर सिंह जाणार प्रशिक्षणाला; प्रदीप जांभळे यांच्याकडे आयुक्तपदाचा चार्ज

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह ( PCMC) आजपासून पाच दिवसांच्या शासकीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जाणार आहेत. आयुक्त पदाचा तात्पुरता पदभार हा अतिरिक्त आयुक्त एक प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

Maval : किल्ले बनवा स्पर्धेत गौरव वाघमारे प्रथम

आयुक्त सिंह हे 20 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत शासकीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गेले आहेत. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार आयुक्त सिंह प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गेले आहेत. 24 नोव्हेंबरपर्यंत त्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे लागणार आहे.

त्यांच्या अनुपस्थित आयुक्तपदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त एक प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी राजकीय शिष्टाचार आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक कामकाज करावे.

कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये. त्याचबरोबर या कालावधीत घेतलेल्या कामकाजाचा अहवाल सादर करावा लागणार आहे. दरम्यान, विविध कामानिमित्त शहरातील नागरिक आयुक्तांकडे येत असतात.

त्यामुळे आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांना त्यांच्याकडील विभागा संदर्भातील नागरिकांचे प्रश्‍न, तक्रारी सोडवाव्या लागणार ( PCMC) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.