PCMC : शहरातील उद्योगांना सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका कटीबद्ध-आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची उद्योगनगरी ही ओळख (PCMC) निर्माण करण्यामध्ये शहरातील उद्योजकांचे खूप मोठे योगदान आहे. उद्योजक शहराच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योजकांकडून येणाऱ्या सूचना, त्यांच्या समोरील प्रश्न जाणून घेणे हे शहराच्या विकासाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरते. बदलत्या काळानुसार लघु आणि मध्यम उद्योजकांसमोरील आव्हाने वाढत आहेत. शहरातील उद्योगांना पोषक वातावरण मिळावे यासाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. तसेच उद्योगांसाठी रस्ते, पाणी, विद्युतपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका नेहमीच तत्पर आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली केले.

‘संवाद उद्योजकांशी’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील उद्योजकांशी संवाद साधला. आयुक्त यांच्या कक्षात झालेल्या बैठकीवेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त विनोद जळक, आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे,  सीआयआयचे कार्यकारी अधिकारी ओंकार भोसेकर, एमसीसीआयएचे संचालक पराग कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे तसेच संजय जगताप, उपाध्यक्ष जयंत कड, सचिव संजय सातव , प्रमोद राणे, संचालक, भानुदास औटी, तातेराव आढे व महापालिकेचे अधिकारी आणि पीसीएमसी स्मार्ट सारथीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Pune : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली खासदार गिरीश बापट कुटुंबीयांची भेट

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाज घटकांशी संवाद साधला जातो. उद्योजक हे शहराच्या विकासाला आकार देणारे महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने ‘संवाद उद्योजकांशी’ या उपक्रमाच्या अंतर्गत खास लघु व मध्यम उद्योजकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी यांनी विचार मांडले. दर तीन महिन्यांतून एकदा उद्योजकांशी संवाद साधण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये उद्योजक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. आयुक्त सिंह यांनी सदर प्रश्नांना उत्तरे देऊन उपस्थितांचे शंकानिरसन केले. यावेळी ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण व संकलन करणे, हानिकारक कचरा मोशी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये पाठवणे, अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करणे, शहरातील काही भागांत रस्त्यांवरील पथदिव्यांची असलेली कमतरता दूर करणे, पावसाळ्यामध्ये वीज पुरवठा खंडित होणे आणि झाडे पडणे या समस्यांवर योग्य कारवाई करणे, एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही बसवणे, अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सेक्टर 7  व 10 मधील उद्योगांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीमध्ये उद्योजकांच्या अनेक समस्यांचे समाधान ( PCMC ) झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.