PCMC : सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या संस्थेला महापालिका तीन लाख देणार

एमपीसी न्यूज – कोरोना संकटकाळात रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, लसीकरण आदी विविध सुविधा पुरविताना तातडीची गरज म्हणून केलेल्या कामकाजापोटी ठेकेदार संस्थेला तीन लाख रुपये देण्यात येणार आहेत.

Warning to the Rebels : सामनातून बंडखोरांना दिला इशारा

 

पिंपरी – चिंचवड पालिकेच्या वतीने (PCMC) कोरोनाकाळात ‘डेव्हलपमेंट ऑफ बेड मॅनेजमेंट’ सॉफ्टवेअर अॅण्ड मोबाईल अॅप्लिकेशन,  इंटिग्रेशन विथ कोविड डॅशबोर्ड आणि सारथी मोबाईल अॅल्पिकेशन ही यंत्रणा विकसित केली होती. हे काम करण्यासाठी ‘स्पिनिक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ यांनी 2 लाख 99 हजार रुपयांचे दरपत्रक सादर केले होते. त्यांच्यासमवेत करार करून कामकाज करून घेण्यात आले. तसेच बिलाची पूर्तताही करण्यात आली.

 

परंतु, ‘स्पिनिक्स सोल्युशन्स’ यांना कोरोनाकाळात रुग्णालये, प्रयोगशाळा, कोरोना केअर सेंटर, जम्बो व्यवस्थापन डॅशबोर्ड’ आणि ‘सारथी’ मोबाईल यंत्रणा, लसीकरण यंत्रणा आदी विविध सुविधांसाठी काम करण्याबाबत आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी सूचना केल्या होत्या. त्यामुळे संस्थेने या यंत्रणेचेही कामकाज केले. या कामापोटी संस्थेने 2 लाख 99 हजार रुपयांची मागणी केली. त्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली. ही रक्कम माहिती – तंत्रज्ञान विभागाच्या ‘संगणक खरेदी व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट’ या लेखाशीर्षावरून खर्च करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.