PCMC : ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर पुरस्काराने महापालिका सन्मानित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला ब्लूमबर्ग फिलॅनत्रॉफीजॲण्ड ग्लोबल डिजाईनिंग सिटीज इनिशिएटीव्ह(जीडीसीआय) यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या (PCMC) ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर(बीआयसीआय) ग्लोबल चॅलेंज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

3 जून 2023 रोजी जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून ही अभिमानस्पद गोष्ट आहे.  संपूर्ण शहरामध्ये पर्यावरणपूरक रस्ते विकसित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या हरित सेतू प्रकल्पासाठी या पुरस्कार देण्यात आला आहे. संपूर्ण जगभरातील 66 देशांमधून आलेल्या 275 अर्जांची अत्यंत काटेकोर तपासणी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामुळे शहरासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शहरातील विविध संस्था तसेच व्यक्ती यांनी ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर(बीआयसीआय) पुरस्कारासाठी प्रस्ताव तयार करण्याकरिता खूप परिश्रम केले. महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेनुसार, सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे आणि कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बायसिकल मेयर ऑफ पिंपरी चिंचवड, आयटीडीपी इंडिया, वास्तूविशारद प्रसन्न देसाई आणि त्यांचे अन्य महत्त्वाचे सहकारी यांनी या कामासाठी विशेष परिश्रम घेतले त्यांचा आयुक्त सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

PCMC : महापालिका नोकर भरतीत स्थानिकांसाठी राखीव कोटा ठेवा

हरित सेतू प्रकल्पाच्या अंतर्गत नाविन्यपूर्ण रस्त्यांचे डीजाईन विकसित करणे प्रस्तावित आहे. त्यामध्ये सायकल चालवण्यास प्राधान्य, वाहतुकीसाठी शाश्वत पर्यायायांना प्रोत्साहन देणे, वसाहती आणि समुदाय यांना प्रोत्साहन देणे, तसेच सर्व नागरिकांना सायकल चालविण्याकरता सुरक्षा आणि उपलब्धता यांमध्ये वाढ करणे अशा विविध संकल्पनांचा समावेश आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर(बीआयसीआय) ग्लोबल चॅलेंजकरिता अर्ज उपलब्ध करण्यात आले.

जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून 2 जून 2023 रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ब्लूमबर्ग फिलॅनत्रॉफीज यांच्या सहकार्याने बीआयसीआय यांच्या वतीने संपूर्ण जगभरातील दहा शहरांतील सायकलशी संबंधित पायाभूत सुविधा विकसित करणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना निधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत निवड झालेले पिंपरी-चिंचवड हे शहर संपूर्ण जगभरातील सर्वोत्तम दहा शहरांपैकी एक आहे. ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर(बीआयसीआय) ग्लोबल चॅलेंज यांच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार म्हणजे हरित, आरोग्यदायी आणि शाश्वत विकासाचा संदेश यांच्याप्रती असलेल्या बांधिलकीची एक प्रकारे पावतीच आहे.

आयुक्त सिंह म्हणाले, शहरात 80 किलोमीटर सायकल ट्रॅक आहे. औंध-रावेत, मुंबई-पुणे महामार्ग, टेल्को रोड (PCMC) येथे सायकल ट्रॅक विकसित करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.