PCMC: महापालिकेची कर भरणा केंद्र उद्याही सुरु राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना 31 मार्चपूर्वी मिळकतकर ( PCMC) भरता यावा, यासाठी उद्या (गुरूवार) महापालिकेची सर्व कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. गुरुवारी रामनवमीची शासकीय सुटी असली तरी ही केंद्र सुरू ठेवली जाणार असल्याचे कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

 

Chakan : भाव पडल्याने कांदा उत्पादक आक्रमक

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मागील तीन महिन्यांपासून शनिवारी तसेच रविवारी कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येत आहेत. मात्र, 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असतानाच गुरुवारी रामनवमीची शासकीय सुटी असल्याने महापालिका बंद असणार आहे.

 

त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन महापालिकेने गुरुवारी दिवसभर करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या दोन दिवसात जास्तीत जास्त नागरिकांनी कराचा भरणा करावा, असे ( PCMC) आवाहन देशमुख यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.