PCMC News : होर्डिंग चालकांकडे 28 कोटींची थकबाकी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC News) शहराचा विस्तार सातत्याने होत असतानाच होर्डिंग उभारणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. शहरात सध्या 1 हजार 812 होर्डिंग आहेत. यामधील 433 होर्डिंगचा वाद न्यायालयात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने 1 हजार 379 हार्डिंग चालकांकडे वसुलीसाठी मागणीपत्र धाडले आहेत.

शहरात गेल्या काही वर्षांपासून होर्डिंगबाजीचे प्रमाण वाढले आहे. नेत्यांचे वाढदिवस, लग्न समारंभासह, जयंती, पुण्यतिथी, श्रद्धांजलीसह आदी कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामधील काही फलक हे अधिकृत असतात तर काही होर्डिंग अनधिकृत असतात. मात्र, पालिकेचा आकाश चिन्ह परवाना विभागाकडून अनधिकृत होर्डिंगवर सातत्याने कारवाई करण्यात येत असते.

Mundhwa News: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, मुंढव्यातील व्यक्तीला अटक

शहरात सध्या 1 हजार 812 होर्डिंग आहेत. यामधील 433 होर्डिंगचा (PCMC News) वाद न्यायालयात असून या होर्डिंगला जैसे थे ठेवण्याचे आदेश आहेत. 2022-23 या चालू आर्थिक वर्षांतील 1 एप्रिलपासून वसुली बंद होती. आता ती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे 1 हजार 379 होर्डिंग चालकांकडे वसुलीसाठी मागणीपत्र पाठविले आहेत. या होर्डिंग चालकांकडे 31 मार्च 2022 अखेर 10 कोटी 85 लाख 72 हजार 150 रूपयांची थकबाकी आहे. तर, 17 कोटी 61 लाख रूपयांची चालू मागणी अशी 28 कोटी 46 लाख 72 हजार 452 रूपये येणे अपेक्षित आहे. यामध्ये आत्तापर्यंत 1 कोटी 56 लाख रूपयांचा भरणा झाला आहे, अशी माहिती आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.