PCMC News: अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मानधनावर भरणार 285 शिक्षक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC News) शाळांमध्ये तब्बल 285 शिक्षकांची कमरता आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात गट ‘क’ संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ही पदे सरळ सेवा प्रवेशाने सहा महिन्यांसाठी मानधन तत्वावर भरती करण्यात येणार आहेत. या शिक्षक भरतीसाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र, अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर या शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण 105 शाळा आहेत. या शाळांमध्ये 18 हजार 893 मुले तर 20 हजार 737 मुली शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 137 शिक्षक आणि 68 मुख्याध्यापक आहेत. मात्र, या शाळांमध्ये तब्बल 285 शिक्षकांची कमतरता होती. या शिक्षकांची कमतरता असल्याचे शिक्षण विभागाला माहिती असताना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर त्वरीत मानधनावर शिक्षकांची भरती करणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या गहाळ कारभाराचा विद्यार्थ्यांना वारंवार फटका बसत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट करण्याच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाच्या कारभारावर पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी (PCMC News) अस्थापनेवर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ही पदे सरळ सेवा प्रवेशाने सहा महिन्यांसाठी भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळा येथे दि. 8 आणि दि.9 डिसेंबर रोजी अर्ज आणि कागदपत्रे घेऊन समक्ष हजर रहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. तसेच निवड होणाऱ्या शिक्षकांना 20 हजार रूपये मानधन देण्यात येणार आहे.

या पदासाठी होणार भरती – 

मराठी माध्यमासाठी- 204
उर्दू माध्यमासाठी – 46
हिंदी माध्यमासाठी- 15
इंग्रजी माध्यमासाठी – 20
एकूण – 285

Today’s Horoscope 01 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.