मंगळवार, डिसेंबर 6, 2022

PCMC News : वैद्यकीय विभागासाठी 443 प्रकारचे ‘सर्जिकल’ साहित्य; 11 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय 
(PCMC News) विभागासाठी 443 प्रकारचे सर्जिकल साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. 23 पुरवठादारांकडून हे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी 11 कोटी 49 लाख रुपये खर्च होणार आहेत.
सर्जिकल साहित्य खरेदीसाठी मध्यवर्ती भांडार विभागामार्फत ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा दर 15 कोटी 58 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये 24 पात्र पुरवठादारांपैकी 23 पुरवठादारांनी लघुत्तम दर सादर केले. या 23 पुरवठादारांनी 443 बाबींसाठी 26.24 टक्के कमी म्हणजेच 11 कोटी 49 लाख रुपये  कमी दर सादर केला. त्यामध्ये पारस सर्जिकल यांच्याकडून 16 प्रकारचे साहित्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी 78 लाख रुपये खर्च होणार आहे. केप्स फार्मा यांच्याकडून 37 प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 79 लाख रुपये खर्च होणार आहे.
Today’s Horoscope 03 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

कोठारी मेडिकल यांच्याकडून सहा बाबी (PCMC News)

खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी 82 लाख रुपये तर प्राईम सर्जिकल यांच्याकडून 80 लाखांचे 47 प्रकारचे साहित्य खरेदी केले जाणार आहे. महेश सर्जिकल अॅण्ड फार्मास्युटिकल्स यांच्याकडून 93 प्रकारचे साहित्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी 69 लाख रुपये खर्च होणार आहे. आनंद डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडून 61 लाखांचे 18 प्रकारचे, मेडिनीला हेल्थ केअर यांच्याकडून 61 लाखांचे 7 प्रकारचे, फार्मा डील यांच्याकडून 59 लाखांचे 26 प्रकारचे आणि साई केअर यांच्याकडून 55 लाखांचे 23 प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय इतर 14 पुरवठादारांकडून 70 प्रकारचे विविध साहित्य खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च होणार आहेत. अशा एकूण 443 बाबींसाठी 11 कोटी 49 लाख रुपये खर्च होणार आहेत.

वैद्यकीय विभागाअंतर्गत दवाखाना व रुग्णालयांकरिता आवश्यक डबल डोअर रेफ्रीजरेटर खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर 11 लाख 52 हजार रुपये अपेक्षित धरण्यात आला. चिंचवड येथील ऍरथ्रोन टेक्नॉलॉजी अॅण्ड एंटरप्रायजेस यांनी 30 रेफ्रीजरेटरसाठी प्रतिनग 28 हजार 750 रुपये म्हणजेच 8 लाख 62 हजार 500 रुपये दर सादर केला. हा दर अंदाजपत्रकीय दरापेक्षा 25.19 टक्के कमी आहे. त्यामुळे हे दर स्वीकृत करण्यात आले.

https://youtu.be/NfPJSr_DJ2E
Latest news
Related news