PCMC News : महापालिका उद्यान विभागातील पदांबाबतची अर्हता, नेमणुकीच्या पद्धतीत सुधारणा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान अथवा वृक्षसंवर्धन विभागातील आस्थापनेवरील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पदांबाबतच्या अर्हता, (PCMC News)नेमणुकीच्या पद्धती व नेमणुकीची टक्केवारी यामध्ये सुधारणा करण्याबाबतच्या विषयाला महापालिका सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.  

या विषयासह महापालिका सभा, स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांनाही त्यांनी मंजुरी दिली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्यासह  विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विषयांना देखील त्यांनी मंजुरी दिली. प्रभाग क्रमांक 2 मधील गट नं 606 आरक्षण 1/446 व बोऱ्हाडेवाडी येथील शाळा इमारतीची उर्वरीत व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या 8 कोटी 30 लाख रुपये खर्चास,(PCMC News) पिंपळे सौदागर पूल ते दापोडी एम एस गुरुत्व वाहिनी वरील देखभाल दुरुस्तीची कामे करणे, व्हॉल्ह बदली करणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या 26 लाख 60 हजार रुपये खर्चास, दापोडी येथील एस.बी.आर. येथील 20 एम.एल.डी. मैलाशुद्धीकरण केंद्राचे चलन, देखभाल, व दुरुस्ती कामासाठी येणाऱ्या 3 कोटी 33 लाख रूपये खर्चास मान्यता दिली.

Youth congress protest : बेकायदा वृक्षतोडीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

तसेच  यामध्ये करसंकलन विभागाकडील मिळकत कर संगणक प्रणाली अद्ययावत करण्यासाठी 6 लाख 90 हजार रुपये खर्चाबाबतच्या विषयाचा, तसेच अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार चिखली, टाळगाव  येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ यांना कामकाजासाठी 30 लाख रुपये अदा करण्याबाबतच्या विषयासह स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांचा समावेश होता.(PCMC News) या बैठकीमध्ये सुमारे 18 कोटी 4 लाख 28 हजार रुपये खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.  तसेच तरतूद वर्गीकरणाच्या विषयांसह इतर विविध विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. त्यास देखील त्यांनी मान्यता दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.