PCMC News: अधिकारी, कर्मचा-यांचे भावनिक ऐक्य, सामंजस्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा

एमपीसी न्यूज : कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा अवलंब न करता, वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व मतभेद विचार विनिमय करुन तसेच संविधानिक मार्गाचा अवलंब करुन(PCMC News) सोडविण्याची तसेच जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि  सामंजस्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.(PCMC News) तसेच सदभावना दिनानिमित्त शपथही यावेळी घेण्यात आली.  माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी सदभावना दिवस प्रतिज्ञेचे वाचन केले. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची  जयंती 20 ऑगस्ट रोजी असून हा दिवस सदभावना दिन म्हणून पाळला जातो.  तथापि, 20 ऑगस्ट रोजी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे 17  ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या वतीने आज जयंती साजरी करण्यात आली.

Science Festival: सायन्स पार्कमध्ये विज्ञान महोत्सवाचे आयोजन; विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, बालाजी अय्यंगार यांच्यासह कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.(PCMC News) शासन निर्णयानुसार 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये महापालिकेच्या वतीने सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना वृध्दिंगत व्हावी असा उद्देश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.