PCMC News: मालमत्ता नोंदणीचा आलेख वाढला! शहरात 5 महिन्यांत 11, 272 नव्या मालमत्तांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC News) शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात असल्याने गृहप्रकल्प मोठ्या संख्येने उभे राहत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मालमत्ताकर नोंदणीचा आलेखही उंचावत आहे. गेल्या 5 महिन्यांत शहरात तब्बल 11 हजार 272 नव्या मालमत्तांची नोंद झाली आहे. त्यातून महापालिकेस दरवर्षी लाखो उत्पन्न मिळणार आहे.

सर्वाधिक 3 हजार 61 मालमत्तांची नोंद वाकड भागात झाली आहे. त्यापाठोपाठ 2 हजार 145 मालमत्ता चिखली परिसरात, 993 मालमत्ता मोशीत, तर 849 मालमत्ता थेरगाव परिसरात वाढल्या आहेत. नव्याने नोंद झालेल्या एकूण 11 हजार 272 मालमत्तांपैकी सर्वाधिक 9 हजार 800 मालमत्ता या निवासी आहेत. तर, 909 मालमत्ता बिगरनिवासी आहेत. औद्योगिक 23, मोकळ्या जमिनी 411, मिश्र मालमत्ता 71 आणि इतर मालमत्ता 58 आहेत. या नव्या मालमत्तांची नोंद झाल्याने महापालिकेस दरवर्षी लाखो उत्पन्न मिळणार आहे.

World Wildlife Week : ‘लंम्पी’ रोगाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे : चंद्रकांत शेटे

दरम्यान, 31 मार्च 2022 पर्यंत महापालिकेकडे एकूण 5 लाख 71 हजार 552 मालमत्तांची नोंद झाली होती. 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2022 या पाच महिन्यांच्या कालावधीत वरील मालमत्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण नोंदविलेले 5 लाख 82 हजार 824 मालमत्ता शहरात आहेत. शहरात नव्या मालमत्तांची नोंद घरबसल्या महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावरून करता येणार आहे. त्या सुविधेचा लाभ नागरिक घेत आहेत. नव्याने खरेदी केलेल्या मालमत्तांची तत्काळ नोंद करावी. तसेच (PCMC News) मुदतीमध्ये कर भरून मालमत्ताधारकांनी विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.