PCMC News : मालमत्ता, उद्यानाच्या सुरक्षेसाठी कंत्राटी रखवालदारांची नेमणूक

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता, उद्यान आणि जलकुंभाच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने आणखी 47 रखवालदार मदतनीसांची नियुक्ती करण्यात येणार आहे.(PCMC News) त्यांना मूळ वेतन 11 हजार 500 आणि महागाई भत्ता 7 हजार 70 असे 18 हजार 570 मासिक वेतन दिले जाणार आहे.

मालमत्ता, उद्यान आणि जलकुंभाच्या सुरक्षेसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय एकूण 1 हजार 305 रखवालदार मदतनीस कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत. कर्मचारी पुरवठ्याचे काम एम. के. फॅसिलिटीज सर्व्हिसेस, नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस, सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी आणि क्रिस्टल इंटेग्रेटेड सर्व्हिसेस या एजन्सींना देण्यात आले आहे.

Women abuse : महिलेवर अत्याचार करत धमकी

मालमत्ता, उद्यान आणि जलकुंभासाठी क्षेत्रीय कार्यालय, उद्यान विभाग आणि पाणीपुरवठा विभागाकडून सुरक्षारक्षक मदतनीस नेमण्याची मागणी केली होती.(PCMC News) सुरक्षा विभागाने आयुक्तांकडे 17 ऑगस्टला प्रस्ताव दिला होता. अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयासाठी 3, ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयासाठी 10, क आणि ई क्षेत्रीय कार्यालयासाठी 19 आणि ड आणि ह क्षेत्रीय कार्यालयासाठी 15 असे एकूण 47 रखवालदार मदतनीस 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत नेमण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.