PCMC News: सफाई कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर; अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेत 25 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या 73 कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत 269 चौरस फुट क्षेत्रांच्या सदनिकांचे सोडतीव्दारे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा मिळाला आहे.(PCMC News) अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या पुढाकारातून ही घरे देण्यात आली. घर मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत ज्या सफाई कर्मचाऱ्यांची 25 वर्ष सेवा झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांना किंवा मृत्यू झालेल्या पात्र कर्मचाऱ्याच्या वारसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत 269 चौरस फुट क्षेत्रांच्या सदनिका देण्याबाबत 2015 मध्ये शासन निर्णय झाला आहे.(PCMC News) या निर्णयानुसार महापालिकेतील 73 कर्मचारी पात्र ठरले आहे. त्यानुसार आरोग्य विभागांतर्गत ज्या सफाई कर्मचाऱ्यांच्या नावावर आजतागायत कोणतीही मिळकत नाही, सदनिका घेण्यासाठी कोणताही लाभ घेतला नाही, अशा पात्र ठरलेल्या 73 कर्मचाऱ्यांना हक्काचे घर महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे.

Alandi news: पोलीस व अग्निशमन दलांच्या कर्मचाऱ्यांना तेजस्विनी संस्थेच्या महिलांनी बांधली राखी

दापोडी, गणेश हाईटस येथील एच, आय विंगमधील 36 जणांना, सुखवाणी वुड्‌स डी विंगमधील 25, गणेश किनारा ई इमारतीमधील 12 अशा 73 जणांना सदनिकांची सोडतव्दारे वाटप करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.(PCMC News) 15 ऑगस्ट रोजी प्रातिनिधिक स्वरूपात पाच जणांना चावी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.