PCMC News :  सवलतीचे दोन दिवस बाकी; ऑनलाइन कर भरा आणि 4 टक्के सवलत मिळवा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिका करसंकलन विभागाच्या वतीने 1 जुलै ते 30 सप्टेंबरअखेर मिळकत कराचा ऑनलाइन भरणा केल्यास सामान्यकरात 4 टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. (PCMC News) दोन दिवसात जास्तीत-जास्त मिळकत धारकांनी ऑनलाइन कर भरून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागातर्फे शहरातील मिळकतींना कराची आकारणी केली जाते. महापालिकेच्या कर संकलन विभागाने गतवर्षी सव्वा सहाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते. यावर्षी 1 हजार कोटींचे उदिष्ट ठेवले आहे. त्यानुसार आर्थिक वर्षातील सहा महिने होत असतानाच बुधवारअखेर 352 कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. संगणक प्रणालीद्वारे मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचे बिलातील सामान्यकरात विविध प्रर्वगांकरिता सवलती लागू आहेत. मात्र, विविध सवलती 30 जूनपर्यंत लागू होत्या. या सवलतींचा दोन लाख मिळकत धारकांनी लाभ घेतला होता.

Ulhas Jagtap : शहीद भगतसिंग यांचे  स्वातंत्र्य चळवळीतील योगदान प्रेरणादायी – उल्हास जगताप

मिळकत कराचा ऑनलाइन भरणा वाढावा, ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी कर संकलन विभागाने ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी पुन्हा नव्याने सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या तीन महिन्याच्या कालावधीत ऑनलाइन कर भरणाऱ्या मिळकत धारकांसाठी सामान्य करात 4 टक्के सवलत देण्याचा निर्णय आहे. 4 टक्के सवलत देण्यासाठी संगणक प्रणालीमध्ये सुधारणाही करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाइन कराचा भरणा केला आहे.(PCMC News) ऑनलाइन कर भरल्यास सामान्य करात 4 टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी उद्या (दि. 29) आणि परवा (दि.30) असे दोनच दिवस राहिले आहे. त्यामुळे दोन दिवसात जास्तीत-जास्त मिळकत धारकांनी ऑनलाइन कर भरून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.