Pimpri News: पिंपरी-चिंचवड शहरातून 71 हजार किलो प्लास्टीक संकलीत, महापालिकेनी शहरात राबवली प्लॉगेथॉन मोहिम

 एमपीसी न्यूज : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून रविवारी (दि.14) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील 75 ठिकाणी सकाळी 8 ते 10 या वेळेत महानगरपालिकेतर्फे प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात आली.(Pimpri News) या मोहिमेअंतर्गत शहरातील तब्बल 71 हजार 580 किलो प्लास्टीक संकलीत करण्यात आले आहे.

रावेत येथील म्हस्के कॉर्नरपासून बीआरटीएस मार्गापर्यंत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन,रिक्षासंघ, विविधमंडळे,एजन्सी,गृहनिर्माण संस्था, बचत गट,खाजगी आणि महापालिका शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, खाजगी संस्था, अशासकीय संस्था, सामाजिक संस्था यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी असे सुमारे 25 हजार नागरिक सहभागी झाले होते.

Pavana Dam: पवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कमी करून 3500 क्यूसेक

यावेळी शहर स्वच्छतेच्या चळवळीला गतीमान करण्यासाठी नागरी सहभाग  शहराच्या विकासाला नवी दिशा आणि चालना देणारा ठरेल. शिवाय  आपल्या शहराला अॅनिमियामुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेमध्ये लोहयुक्त गोळ्या घेण्याचा सल्ला दिला असेल तर त्या नक्की घ्याव्यात.(pimpri News) देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. निरंतर शाश्वत विकास साधण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. प्लॉगेथॉन उपक्रमाच्या माध्यमातून आपण निर्माण केलेला कचरा आपणच स्वच्छ केल्यास शहराचे आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होईल. यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी यावेळी केले.

plastic collected

यावेळी ‘मी भारताचा सुजाण नागरिक अशी शपथ घेतो कि, या देशाला आणि माझ्या शहराला स्वच्छ व सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. प्लास्टिकचे दुष्परिणाम पाहता मी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणार नाही. बाजारात जाताना मी कापडी पिशवी घेऊन जाईल.(Pimpri News) माझ्यामुळे प्लास्टिकचा कचरा निर्माण होणार नाही याची काळजी मी घेईन.नद्या नाले निसर्ग प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन’ अशी शपथ घेऊन शहर स्वच्छतेचा संकल्प यावेळी करण्यात आला. थेरगावमधील जुन्या ग क्षेत्रीय कार्यालयासमोर तसेच रहाटणी येथील तांबे चौक येथे शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हातात तिरंगा घेऊन भारत मातेचा जयघोष करत साखळी तयार केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.