गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

PCMC News: महापालिकेत 386 पदांसाठी नोकर भरती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC News) मेगा भरती होणार आहे. महापालिकेतील विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 386 पदांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने भरतीचा धडाका लावला आहे. महापालिकेची वैद्यकीय विभागातील भरती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे.  महापालिका सेवेतून दरमहा नियत वयोमानानुसार 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. काही कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत. त्यामुळे महापालिकेत सुमारे पाच हजार पेक्षा पदे रिक्त आहेत. या पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिका वेळोवेळी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करत आहे.

महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोसे कारभार सुरू (PCMC News) असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून पालिकेत बंदी असलेली नोकर भरती राज्य सरकारने नुकतीच उठविली आहे. त्यामुळे महापालिकेने सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 386 रिक्त पदांची सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

यामध्ये लिपिक-213, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 75, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-41, कनिष्ठ अभियंता (विद्युत)-18, आरोग्य निरीक्षक-13, अतिरिक्त कायदा सल्लागार-1, विधी अधिकारी-1, उपमुख्य अग्शिमन अधिकारी-1, उद्यान निरीक्षक-4, हॉट्रीकल्चर सुपरवायझर-8 अशी विविध पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. शैक्षणिक अर्हता, आरक्षण, यासह सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर 19 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Today’s Horoscope 17 August 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

spot_img
Latest news
Related news

8 COMMENTS

Comments are closed.