PCMC News: भाटनगर येथील मैला शुद्धीकरण केंद्राचे नुतनीकरण, 31 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – भाटनगर येथील महापालिकेच्या (PCMC News) जुन्या मैला शुद्धीकरण केंद्राचे नुतनीकरण करून त्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याकामी येणाऱ्या 31 कोटी रुपये खर्चासह स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 65 कोटी 40 लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

Dehuroad News : पोलिसांच्या संगनमताने खुलेआम अवैधरित्या दारू विक्री – श्रीजित रमेशन

महापालिका हद्दीबाहेरील खडकी कॅन्टोनमेंट क्षेत्रात बोपखेल गावासाठी (PCMC News) पोहोच रस्ता बांधण्यात येणार असून इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. याकामी 19 कोटी 32 लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र.20 मधील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील चाणक्य कार्यालयाच्या वरती दुस-या मजल्याचे विस्तारीकरण तसेच नवीन शवागृह इमारत बांधणे या कामांतर्गत उर्वरित स्थापत्य विषयक अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या 2 कोटी 60 लाख रुपये सुधारित खर्चास मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.