PCMC News : शहरातील खड्डे 15 ऑक्टोबरनंतरच बुजविणार!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC News) शहरातील 90 टक्के खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला असून मुख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. नागरिकांना 15 ऑक्टोबरपर्यंत हे खड्डे सहन करावे लागणार आहेत. कारण, 15 ऑक्टोबरनंतरच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Bhosri Crime : भाच्याचे अपहरण करून बेदम मारहाण करणाऱ्या मामांवर गुन्हा दाखल

शहरातील विविध भागातील रस्त्यांवर 3 हजार 773 खड्डे होते. यापैकी 3 हजार 382 म्हणजे 90 टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील विविध भागात आजही मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याबाबत आयुक्त सिंह यांना विचारले असता ते म्हणाले, महापालिकेने खड्डे बुजविले आहेत. काही रस्त्यांवर अद्यापही खड्डे आहेत. त्याबाबत दुमत नाही. रस्त्यावर खड्डा पडल्यावर त्याला जबाबदार कोण, त्याचा दर्जा कोण तपासणार याबाबतचे धोरण ठरविण्यात येणार आहे. सध्या पाऊस सुरू (PCMC News) आहे. त्यामुळे 15 ऑक्‍टोबरनंतर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.