PCMC News : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान देणा-या स्वातंत्र्यवीरांची देशभक्ती, त्याग आणि समर्पण कार्याचा जागर करण्यासाठी तसेच देशवासीयांच्या मनात देशभक्तीची दिव्य ज्योत तेवत ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या सांकृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी (PCMC News) केले आहे.

केंद्र सरकार व राज्यशासन यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने शहरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ विविध कृतीशील उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी सव्वा आठ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी साडे नऊ वाजता  निगडी येथील भक्ती शक्ती चौकाजवळील  प्रांगणात देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता निगडी, प्राधिकरण येथे शालेय विद्यार्थ्यांद्वारे मानवी साखळीच्या माध्यमातून देशाच्या नकाशा असलेली राष्ट्रध्वज आणि भारतीय स्वातंत्र्याशी संबंधित विविध प्रतिकृतींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता भक्ती-शक्ती उद्यान, निगडी येथे ‘गाथा अमर क्रांतीविरांची’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्यासह 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान रक्तदान शिबि 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम (प्लॉगेथॉन), पदयात्रा, प्रभातफेरी, प्लास्टिक मुक्ती जनजागृती मोहीम, चित्ररथाद्वारे विविध उपक्रमांबाबत जनजागृती असे विविध उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत.

Pune Police : पुण्यात महिला पोलिसाकडून वीस लाखाची फसवणूक, काय आहे प्रकरण वाचा…

महापालिकेच्या वतीने (PCMC News) आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांमार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज ‘ड’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदात्यांमार्फत मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महापालिकेच्या रुग्णालयात आवश्यक असणारी रक्तपुरवठ्याची गरज भागणार आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.