PCMC News: पाणीपुरवठा प्रकल्प सल्लागाराला वाढीव सव्वादोन कोटींचे शुल्क

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC News) अमृत योजना आणि शहरातील पाणीपुरवठा विषयक प्रकल्पांसाठी नेमलेल्या तांत्रिक सल्लागाराला देण्यात येणारे शुल्क कमी पडत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थापन राबविण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे या कामातील 2 कोटी 20 लाख रूपये हे शुल्क देण्यासाठी वळविण्यात येणार आहे.

महापालिकेकेच्या अमृत आणि महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा विषयक प्रकल्पांसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून डी. आर. ए. कन्सल्टंट लिमिटेड यांची नेमणूक करण्यात आली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात तांत्रिक सल्लागार यांना देण्यात येणारे शुल्क कमी पडत आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या कामांच्या तरतुदीत वाढ करावी लागणार आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या क्षेत्रातील राहिलेल्या व नव्याने समाविष्ट होणार्‍या भागात पाणीपुरवठा व्यवस्थापन राबविण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे या कामासाठी पाच कोटीची तरतुद आहे. त्यामध्ये 95 लाखाची वाढ करावी लागणार आहे.

Central Railway : मध्य रेल्वेद्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 विशेष गाड्या

तर, अमृत योजनेतील पाणीपुरवठा विषयक कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन (PCMC News) सल्लागार नेमणे व अनुषांगक कामे करणे यासाठी 25 कोटीची तरतुद आहे. त्यामध्ये 1 कोटी 25 लाख रूपये वाढ करण्यात येणार आहे. जॅकवेल व पंप हाऊस बांधणे या लेखाशिर्षावर पाणीपुरवठा विशेष योजना निधी म्हणून 10 कोटीची तरतुद आहे. त्यामधील 2 कोटी 20 लाख रूपये घट करून ही रक्कम तांत्रिक सल्लागारांचे शुल्क देण्यासाठी वळविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.