PCMC : मालमत्ता कर थकबाकी नसल्याची ‘एनओसी’ मिळणार ऑनलाइन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, मालमत्ताधारक यांना कर संकलन विभागाचा मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला (एनओसी)  महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in  या संकेतस्थळावरुन (PCMC) घेता येत आहे.

शहरातील नागरिक, मालमत्ताधारक यांना निवडणूक लढवण्यासाठी तसेच अन्य कामांसाठी कर संकलन विभागाचा मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला (एनओसी) आवश्यक असतो. नागरिकांना हा दाखला घरबसल्या मिळावा, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने ऑनलाइन दाखल देण्याची सुविधा 1 एप्रिल 2022 पासून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. नागरिक www.pcmcindia.gov.in  या संकेतस्थळावरून हा दाखल मिळवू शकतात, असे कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.

Pimpri News : ऑटोरिक्षा मीटर पुनःप्रमाणीकरण न केलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई

महापालिकेच्या हद्दीमध्ये मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना कर संकलन विभागाची एनओसी घेण्यासाठी आता महानगरपालिकेत अथवा महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. त्यासाठी त्यांना फक्त महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर जावे लागेल. याच संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडील मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखल नागरिकांना ऑनलाइन मिळेल. तरी नागरिकांनी (PCMC) या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.