PCMC : महापालिकेच्या 88 इमारतींना  नोटीसा

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहरात 88 धोकादायक इमारती व घरे (PCMC) असून यामध्ये अतिधोकादायक 17 इमारती आहेत. धोकादायक इमारतींची सर्वाधिक 32 संख्या “ड” क्षेत्रीय कार्यालय हद्दीत तर सर्वात कमी “क” क्षेत्रीय कार्यालय हद्दीत फक्त 6 इमारती आहेत. त्या सर्व इमारतींना महापालिकेने नोटीस दिली आहे.

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडण्याची शक्‍यता असते. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या वतीने शहरातील धोकादायक बांधकामे स्वतःहून काढून घ्यावीत किंवा ती तातडीने दुरूस्त करून घ्यावीत, असे आवाहन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नागरिकांना केले जाते.

Wanwadi : वानवडीत सराईत गुन्हेगारावर फायरिंग करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

अशा धोकादायक इमारतींना अधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या आहेत. अशा इमारतींची संख्या शहरात 88 आहे. त्यातील 17 इमारती या अतिधोकादायक आहेत. सर्वाधिक 32 धोकादायक इमारती या “ड” क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

नोटीस दिल्यानंतर त्यातील 88 इमारती पैकी 18 रिकाम्या करून त्याची दुरूस्ती करून घेण्यात आली आहे. तर, इमारती रिकाम्या न करता 3 इमारतींची दुरूस्ती केली गेली. 67 इमारतींची किरकोळ दुरुस्ती केली (PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.