Pune News : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील गोठे धारकांसाठी सूचना; गोठ्याचे अनुज्ञप्ती व नूतनीकरण शुल्क भरा अन्यथा…

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील गोठे धारकांनी गोठ्याचे जनावरांच्या प्रमाणात अनुज्ञप्ती शुल्क व नूतनीकरण शुल्क भरावे असे जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील गोठे धारकांसाठी आवाहन केले आहे.

अनुज्ञाप्ती अधिकारी तथा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी सतिश डोईफोडे यांनी माहिती दिली की, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गोठेधारकांनी गोठ्यांचे जनावरांच्या प्रमाणात अनुज्ञाप्ती शुल्क वनूतनीकरण शुल्क कार्यालयीन वेळेत बँकेचे चलन प्राप्त करुन बँकेत भरावे.

याबाबत 31 मार्च 2022 अखेर गोठेधारकांनी शुल्क न भरल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी क्षेत्रात गुरे पाळणे व त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम 1976 मधील कलम 6 अन्वये गोठेधारकांना देण्यात आलेला परवाना (लायसन्स) निलंबीत अथवा रद्द करण्यात येणार असल्याचेही डोईफोडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.