PCMC : आता जलनि:सारण विभागाचे कामकाजाही पर्यावरण विभागाकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC News) जलनिःसारण विभागाचे कामकाज पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आले आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामधील वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा झपाट्याने होणारा विकास इत्यादी बाबी विचारात घेता महापालिकेमार्फत शहरातील परिणामकारक जलनि:सारणासाठी एकसंघ निर्णय प्रक्रिया आवश्‍यक आहे. जलनि:सारण विभागाचे कामकाजामध्ये पारदर्शकता, गतिमानता, कामकाजात सुसूत्रता यावी, निर्णयप्रक्रिया सुलभ व जलद होणे आवश्‍यक आहे.

Chinchwad Bye-Election : आचारसंहिता भंगाच्या 59 तक्रारी

नद्यांमधील जलपर्णी काढण्याचे कामकाज यापूर्वीच पर्यावरण (PCMC News) विभागाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानंतर आता जलनि:सारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांच्याकडील पदभार काढून तो पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.