PCMC : सहशहर अभियंता पदासाठी अधिकाऱ्यांची फिल्डिंग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत शहर अभियंता या (PCMC)  पदास समकक्ष मुख्य अभियंता ही दोन पदे नुकतीच निर्माण करण्यात आली आहेत. त्या पदावर सह शहर अभियंता श्रीकांत सवणे व रामदास तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही पदावर आपली वर्णी लागावी म्हणून काही कार्यकारी अभियंत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.

Nigdi : शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेत वसुबारस व दीपोत्सव साजरा

सवणे व तांबे यांची पदोन्नती झाल्याने सहशहर अभियंता ही दोन पदे रिक्त झाली आहे. सह शहर अभियंता पदाची खुर्ची मिळावी म्हणून काही कार्यकारी अभियंते प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न केले जात आहेत.

अधिक वर्षे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिलेल्या अधिकाऱ्यांची या पदावर नियुक्ती होणार आहे. सहशहर अभियंता म्हणून या रिक्त झालेल्या या दोन पदावर कोणाची नियुक्ती होणार याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू (PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.