PCMC : महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने (PCMC) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त विठ्ठल जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे,प्रशासन अधिकारी नंदकुमार येनपूरे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी उपस्थित होते.

विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. त्यांनी देशासाठी अनेक वर्षे तुरुंगवास देखील भोगला होता.स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात (PCMC) येते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.