PCMC : चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून थकबाकी असणारे मालमत्ताधारक रडारवर

एमपीसी न्यूज – महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागाने वारंवार आवाहन करूनही मालमत्ता कर थकबाकी न भरणाऱ्यांच्या विरोधात आता आक्रमक ( PCMC ) भूमिका घेतली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून मूळ कराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे पुढील आठवड्यापासून वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रसिद्ध केली जाणार आहेत. कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, या थकबाकीदारांमध्ये केवळ निवासी मालमत्ताधारक नव्हे तर विविध कंपनी, संस्था, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. चार वर्षांपासून थकबाकी असणाऱ्या मालमत्तांची संख्या 1 लाख 186 असून त्यांच्याकडे एकूण 305 कोटी 69 लाख 75 हजार रुपयांची थकबाकी आहे.  कर संकलन विभागाने वारंवार नोटीस देऊनही कर भरत नसलेल्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Crime News : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेसह दोघांना अटक

 

यामध्ये सर्वात प्रथम प्रामुख्याने ज्यांच्याकडे चार वर्षांपासून मुळ मालमत्ता कराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यातही सर्वात प्रथम बिगर निवासी मालमत्ताधारक म्हणजेच औद्योगिक, व्यावसायिक आदी प्रकारच्या मालमत्ताधारकांची ( PCMC ) नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मालमत्ताधारकांची यादी तयार करण्याचेही कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

कर आकारणी व कर संकलन विभागाच्या आकडेवारीनुसार मागील चार वर्षात मालमत्ता कर न भरल्यामुळे एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या 1 लाख 186 एवढी आहे. यासर्वांकडे मिळून एकूण 305 कोटी 69 लाख 75 हजार 284 रुपये थकबाकी आहे.

यामध्ये निवासी मालमत्तांची संख्या 84 हजार 557 असून त्यांच्याकडील थकबाकी 168 कोटी 48 लाख 8 हजार143 रुपये, बिगर निवासी मालमत्तांची संख्या 12 हजार 973 असून त्यांच्याकडील थकबाकी 87 कोटी 78 हजार 427 रुपये,  औद्योगिक मालमत्तांची संख्या 392 असून त्यांच्याकडील थकबाकी 10 कोटी 57 लाख 67 हजार 339 रुपये, तर मोकळ्या भूखंडाची संख्या 2 हजार 222 असून त्यांच्याकडील मालमत्ता कर थकबाकी 39 कोटी 54  लाख 16 हजार 829 एवढी आहे.

 

Pune Crime News : पुणे विद्यार्थी गृहाच्या पदाधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी

या सर्वांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे नियोजन कर आकारणी व कर संकलन विभागाने केल्याने वारंवार मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

84 हजार 557  निवासी ( PCMC ) मालमत्ताधारकांकडे 168 कोटी 48 लाख 8 हजार 143, बिगर निवासी 12 हजार 973  मालमत्ताधारकांकडे 87 कोटी 78 हजार427, औद्योगिक 392 मालमत्ताधारकांकडे 10  कोटी 57 लाख 67 हजार 339 , मोकळा भूखंड – 2 हजार 222 – 39 कोटी 54 लाख 16 हजार 829 कोटी कर थकला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.