Pimpri: यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते साफसफाईची निविदा रद्द करा – नाना काटे

pcmc opposition party leader Nana Kate demands cancellation of PCMC mechanical road sweeping tender. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात विरोधी पक्षनेते काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना सत्ताधारी भाजपकडून स्विपर निविदा प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे. ही निविदा वादग्रस्त ठरली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते साफसफाईच्या निविदेत प्रचंड अनियमितता झाली आहे. या निविदेच भ्रष्ट्राचार झाला आहे. त्यामुळे ही निविदा  प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. तसेच  कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या सफाई कामगारांना महापालिका सेवेत कायम घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात विरोधी पक्षनेते काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरू असताना सत्ताधारी भाजपकडून स्विपर निविदा प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे. ही निविदा वादग्रस्त ठरली आहे. सध्या शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 204 वर गेली आहे. या संकटकाळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका प्रशासन यांच्या इतकेच सफाई कर्मचा-यांचे मोठे योगदान आहे.

या स्विपर निविदा प्रक्रियामुळे कोरोना महामारी संकटात अत्यंत दुर्देवी परिस्थितीत ज्या 1150  सफाई कर्मचाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी कुटुंबाची पर्वा न करता सांभाळली. या लोकांचीच नोकरी धोक्यात येणार असल्याने भ्रष्ट्राचारी निविदा  प्रक्रिया रद्द करून त्या सफाई कामगारांना महापालिकेत कायमची नोकरी द्यावी अशी मागणी काटे यांनी केली आहे.

शहरात उद्योगधंदे बंद असल्याने लोकांच्या हाताला काम नाही. जनतेला महापालिकेकडून शक्य होईल तेवढ्या सुविधा पुरविल्या पाहिजेत. मात्र सामान्य जनतेच्या सुखापेक्षा सत्ताधारी भाजपकडून महापालिकेला ओरबडून खाण्याची वृत्ती अधिक आहे. महापालिकेने रस्ते सफाईचे 745 कोटी रुपयांची निविदा काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती.

या प्रक्रियेत मनमानी पद्धतीने अटी व शर्ती बदलल्या असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे.  रस्ते सफाईच्या या निविदा प्रक्रियेची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी काटे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.