PCMC : आयटीआयच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण व रोजगाराच्या उच्च संधीसाठी कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज : विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात करिअरच्या सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी (PCMC) महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी यांच्या वतीने ग्राड ड्रीम्स एज्युकेश कन्सल्टिंग प्रायमेट लिमिटेड इंडिया यांचे व्होकेशनल स्टडी एन्ड एम्प्लाईमेट अग्रॉड प्रोग्रम फॉर आयटीआय स्टुडन्ट या अंतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Bhosari News: अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

या कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले, यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, औद्योगिक शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. शशिकांत पाटील, मेजर उदय जरांडे तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.