PCMC: …अन्यथा एकही सदनिकाधारक मालमत्ता कर भरणार नाही; सोसायटी फेडरेशनचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका उपयोगकर्ता (PCMC) मूल्याची आकारणी पूर्वलक्षी प्रभावाने करणार असून हे अन्यायकारक आहे. उपयोगकर्ता शुल्क रद्द करावा. अन्यथा आमच्या गृहनिर्माण सोसायटीमधील एकाही सदनिकाधारक मालमत्ता कर भरणार नाही. याबाबत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात सांगळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने या चालू वर्षांपासून कर आकारणी करताना उपयोगकर्ता शुल्क चालू केले आहे. याची अंमलबजावणी ही पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 2019 पासून करण्याचे नियोजन केले. नवीन मालमत्ता कराच्या बिलांमध्ये याचा समावेश केलेला आहे. उपयोगकर्ता मूल्याची आकारणी व वसुली एकदम चुकीचे व आम्हा सोसायटीधारकांच्यावर अन्याय करणारी आहे.

याला पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचा कडाडून विरोध आहे. त्वरित हे उपयोगकर्ता शुल्क रद्द करून मालमत्तेवर जुन्या पद्धीने कर आकारणी करून नवीन मालमत्ता कर आकारणी पत्रक जाहीर करावे. अन्यथा आमच्या एकाही सोसायटीमधील एकाही सदस्य हा मालमत्ता कर भरणार नाही. तसेच याबाबत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल

Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी ए बोलतो आहे असे सांगत ससून हॉस्पिटलच्या डीन यांना फेक कॉल

महापालिकेमध्ये ज्या वेळेपासून प्रशासकीय राजवट चालू झालेली आहे. तेंव्हापासून प्रशासक तथा आयुक्त मनमानी करून कोणत्याही राजकीय पक्षाला, कोणत्याही सामाजिक संस्थांना हौसिंग फेडरेशनच्या (PCMC) प्रतिनिधींना विश्वासत न घेता काहीही निर्णय घेत आहेत. यामध्ये मालमत्ता हस्तानंतरण शुल्कवाढ, तसेच आताचे उपयोगकर्ता शुल्क वसुली असे निर्णय घेतलेले आहेत. हे आम्हाला मुळीच मान्य नाहीत. आयुक्तांनी हे निर्णय त्वरित रद्द करावेत आणि आपण शहराचे मालक नव्हे तर पालक आहोत याची जाणीव ठेवावी, असेही सांगळे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.