PCMC : बक्षीसाची रक्कम दोनवेळा मिळालेल्या 250 पैकी 107 विद्यार्थ्यांनी पैसे केले परत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) समाज विकास विभागाकडून दोनवेळा मिळालेल्या बक्षीसाचे दहावी, बारावीच्या 250 पैकी 107 गुणवंत विद्यार्थ्यांनी डबल मिळालेले पैसे महापालिकेला परत केले आहेत. 143 विद्यार्थ्यांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबविली जाते. दहावी व बारावीमध्ये मध्ये 90 टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये दिले जातात. तर, 80 ते 90 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये दिले जातात.

Vadgaon : घरातील कचरा कचरा गाडीतच टाका; उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांचे आवाहन

यंदा 250 विद्यार्थ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये दोनदा (PCMC) पाठविण्यात आले. त्याची रक्कम 25 लाख इतकी आहे. ही रक्कम परत मिळविण्यासाठी समाज विकास विभागातील लिपिक व कर्मचाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना मोबाइलवर मॅसेज केले आहेत. आतापर्यंत 107 विद्यार्थ्यांनी पैसे परत केले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेचे लिपीक आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.