PCMC : शिपायाने सात वर्षे मारली दांडी, पालिकेने केले बडतर्फ

एमपीसी न्यूज – सात वर्षे कामावर दांडी मारणा-या आणि महापालिकेच्या (PCMC) नोटीशीला केराची टोपली दाखविणा-या शिपायाला अखेर सेवेतून काढून टाकले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जारी केला आहे.

सुनील वसंत पाटील असे बडतर्फ केलेल्या शिपायाचे नाव आहे. ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये पाटील हे शिपाई म्हणून कार्यरत होते. मे 2016 पासून आज अखेर ते कामावर आले नाहीत. तसेच त्याबाबत त्यांनी प्रशासनाला कळवले देखील नाही. यानंतरही महापालिका प्रशासनाने त्यांना सेवेत राहण्याच्या अनेक संधी दिल्या.

त्यांची वेतनवाढ दोन वेळेस तात्पुरत्या स्वरूपात रोखली होती, तसेच त्यांना वारंवार नोटीसही दिली होती. वर्तमानपत्रातदेखील त्याबाबत नोटीस दिली होती. मात्र, पालिकेच्या कोणत्याही आदेशाला त्यांनी उत्तर दिले नाही. पाटील हे त्यांच्या राहत्या पत्त्यावर आढळले नाहीत.

Maharashtra : शिंदे – फडणवीस नैतिकतेच्या आधारावर स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत – अजित पवार

 

पालिकेने त्यांच्याशी केलेला पत्रव्यवहार परत आला. पालिका प्रशासनाने त्याच्या नातेवाइकांशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे पाटील यांना महापालिका सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडे असलेले वाहन कर्ज, गृहकर्ज आदी पालिकेला येणाऱ्या रक्कमा पाटील यांना देय असलेल्या रक्कमांमधून वसूल करण्यात (PCMC) येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.