PCMC : जनता संपर्क अधिकारीपदी प्रफुल्ल पुराणिक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनता संपर्क विभागातील (PCMC) मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक यांच्याकडे जनता सपंर्क अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढला आहे.

Vishwanath Mahadeshwar : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांना आठ महिन्यांपूर्वी विशेष अधिकारीपदी बढती मिळाली. त्यामुळे जनता संपर्क अधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे या पदावर अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी जनता संपर्क विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती. त्यानुसार विभागातील मुख्य लिपिक पुराणिक यांच्याकडे जनता संपर्क अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार (PCMC )आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.