PCMC Property tax : नागरिकांनी 30 जूनपर्यंत मालमत्ता कर सवलतीचा लाभ घ्यावा

सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC Property tax) महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत विविध मालमत्तांना वेगवेगळ्या सवलती जाहिर करण्यात आलेल्या आहेत. यापैकी कुठल्याही सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर 30 जूनपूर्वी आपल्या संपूर्ण मालमत्ता कराचा भरणा करून नागरिकांनी सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालमत्ता कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

महापालिकेच्या वतीने महिलांना सामान्य करामध्ये 50 टक्के सवलत, दिव्यांगांना सामान्य करामध्ये 50 टक्के सूट, माजी सैनिकांना मालमत्ता करात संपूर्ण सवलत तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास 5 टक्के सवलत देण्यात येते. 30 जूनपूर्वी आगाऊ भरणा करणाऱ्या नागरिकांना सामान्य करात 10 ‍टक्के सूट देण्यात येते. तसेच, पर्यावरण पूरक इमारतींना व पर्यावरण पुरक निवासी मालमत्तांनी पर्यावरण पूरक उपक्रम राबविल्यास त्यांना सूट मिळते. यामध्ये, पर्यावरणपूरक मालमत्तांना 10 टक्के, आगाऊ भरणासाठी 10 टक्के तसेच ऑनलाईन भरण्यासाठी 5 टक्के असे एकूण 25 टक्कांपर्यंत सवलत दिली जाते. सवलत घेण्याची शेवटची तारिख 30 जून 2022 असून सर्व नागरिकांनी मालमत्ता कर सवलतीचा लाभ घेणे आवश्यक आहे.

Chandrakant Patil : शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही

अनेक लोकांनी मनपाकडे भरणा केलेला (PCMC Property tax) आहे. मात्र, ज्या लोकांनी अद्यापपर्यंत भरणा केलेला नाही. अशा नागरिकांना नियम 138 अन्वये नोटीस पाठविलेली आहे. म्हणजे ज्यामध्ये फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होतो.  ज्यांचे उत्तर मिळालेले नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर गेल्यावर्षी ज्या मालमत्तांना जप्ती पूर्व नोटीसा दिलेल्या होत्या. त्यामधील ज्या लोकांनी अद्यापपर्यंत कराचा भरणा केलेला नाही. अशा मालमत्तांची 1 जुलै 2022 पासून जप्तीची कार्यवाही सुरु करणार असून त्यामध्ये जप्ती कार्यवाही कामी महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्स व क्षेत्रीय कार्यालयाकडील संपूर्ण टीम अशा प्रकारे कार्यवाही करण्यात येणार आहे.

अशी अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी नागरिकांनी कराचा भरणा करणे आवश्यक आहे. याचबरोबर अशा स्वरुपाची कार्यवाही करत असताना काही दंडनिहाय कार्यवाही असल्यास त्याचाही विचार मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने जे नागरिक प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरणा करत आहेत. त्यांना सवलत योजना व जे नागरिक कराचा भरणा करत नाही, त्यांच्यासाठी जप्तीची कार्यवाही अशी दुहेरी कार्यवाही करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.