PCMC: थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करताच मालमत्ता कराचा भरणा वाढला, 8 दिवसात तिजोरीत 50 कोटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 10 लाखांवरील (PCMC) थकबाकीदारांची दैनिकांमधून नावे प्रसिद्ध करताच मालमत्ता कराचा भरणा वाढला आहे. मागील 8 दिवसांपासून थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जात असून या कालावधीत 40 ते 50 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा झाला आहे. त्यामुळे कर आकारणी व कर संकलन विभागाच्या थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्याच्या ‘फंड्या’चा फायदा होताना दिसत आहे. आपल्या नावाची अपप्रसिद्धी टाळण्यासाठी इतर थकबाकीदार कराचा भरणा करताना दिसून येतात.

महापालिकेचा मालमत्ता कर हा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाला 2022-23 या आर्थिक वर्षात 950 कोटी रुपयांचे उदिष्ट आहे. आत्तापर्यंत 731 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी आठ दिवस बाकी आहेत. त्यामुळे कर वसुलीची मोहिम तीव्र केली आहे.

महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर आकारणी रजिस्टरला नोंद असलेल्या मालमत्ताधारकांपैकी ज्या मालमत्ता धारकांस 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे बील दिले. घरभोटी, सूचना, नोटीस देवूनसुद्धा कराची थकित रक्कम विहित मुदतीत भरणा केलेला नाही. अशा 10 लाखांवरील थकबाकीदारांची नावे दैनिकांमधून प्रसिद्ध केली जात आहेत.

2022-23 अखेरची मालमत्ता कराची थकीत संपूर्ण रक्कम जवळच्या विभागीय कर संकलन (PCMC) कार्यालयात रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्नारे किंवा ऑनलाइन पद्धतीने तत्काळ भरुन मालमत्तेचा पाणीपुरवठा खंडित होणे, स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती होणे अशी कटू कारवाई टाळण्याचे आवाहन केले जात आहे.

Alandi : आळंदी नगरपरिषदेची दिव्यांगांना मदत 112 जणांना प्रत्येकी 3000 वितरित

मागील आठ दिवसांपासून विविध दैनिकांमधून 10 लाखांवरील थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली जात आहेत. पहिल्यांदाच थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्याचा फंडा महापालिकेने अवलंबला आहे. त्याचा फायदा होताना दिसून येत आहे. मालमत्ता कराचा भरणा वाढला आहे.

थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध होताच मागील आठ दिवसांत 40 ते 50 कोटी रुपयांचा भरणा झाला असल्याचे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले. आपल्या नावाची अपप्रसिद्धी टाळण्यासाठी इतर थकबाकीदार कराचा भरणा करताना दिसून येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.