PCMC rally: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घर-घर तिरंगा अभियान रॅली

एमपीसी न्यूज: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल चिखली – मोशी व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांच्या सहकार्याने घर घर तिरंगा अभियान रॅली काढण्यात आली.(PCMC rally) महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत चारशे शालेय विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी यांचा सहभाग होता.

 

भारत माता की जय, वंदे मातरम, अशा गर्जनांनी मोशीतील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज रेसिडेन्सी व परिसर दुमदुमून गेला.
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाता मध्ये तिरंगा ध्वज आणि गळ्या मध्ये तिरंगा फीती होत्या.(PCMC rally) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशाप्रती अभिमान व स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती करणारे संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आले.

Grampanchayat election: राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; सरपंच थेट जनतेतून

शाळेतील विद्यार्थ्यांचे देशाप्रती प्रेम आणि पाऊस पडत असतानाही दाखवलेला उत्साह पाहून अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी समाधान आणि कौतुक व्यक्त केले. (PCMC rally) या रॅलीत संस्थेचे अध्यक्ष संजय सिंग, संचालक प्रशांत पाटील, तानाजी दाते, सहाय्यक आरोग्य अधिकारी, परिवहन कार्यालयाच्या निरीक्षक अनुराधा जुमडे, कोमल गाडेकर,अमृत गोडसे, रवींद्र गावडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उज्जिनवाल, वैभव घोळवे, संजय मानमोडे, क्षितिज रोकडे आदी सहभागी झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.