PCMC : 105 डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती

एमपीसी न्यूज – प्रशासकीय कामकाज करण्यासाठी (PCMC) महापालिकेच्या शिक्षण विभागाने 105 डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्‍सेल सीटमध्ये माहिती भरणे यासह आदी विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे.

Maval : पत्रा उचकटून दोन मोबाईल पळवले

यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा (PCMC) परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. याचा विचार करून प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने 105 डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.