PCMC : अग्निशमन दल केंद्राच्या सुरक्षेसाठी 29 माजी सैनिकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) शहरातील विविध ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या केंद्रांच्या सुरक्षेसाठी 29 माजी सैनिकांची सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या सुरक्षारक्षकांना दरमहा 30 हजार 122 रूपये वेतन दिले जाणार आहे.

अग्निशमन विभागाचे पिंपरी, भोसरी, प्राधिकरण, रहाटणी, तळवडे, चिखली, थेरगाव व मोशी अशी आठ केंद्रे आहेत. प्रत्येक पाळीमध्ये एका वेळी जास्तीत जास्त 3 ते 4 कर्मचारी हजर असतात. हे कर्मचारी तातडीने वर्दी मिळालेल्या घटनास्थळी गेल्यानंतर केंद्रात एकही कर्मचारी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे तेथील साहित्य, उपकरणे, कागदपत्रांची चोरी होऊ शकते. केंद्राच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव अग्निशमन दलाने दिला होता.

Vadgaon Maval : आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विजय आपलाच – आमदार सुनिल शेळके

त्यानुसार निविदा प्रक्रिया न राबविता माजी सैनिक (PCMC) संस्थेकडून थेट 29 माजी सैनिक सुरक्षारक्षक म्हणून घेण्यात येणार आहेत. त्यांना दरमहा 30 हजार 122 रूपये वेतन दिले जाणार आहे. त्यांचा वेतनाचा मासिक खर्च 8 लाख 73 हजार 538 इतका आहे. त्यांच्या वेतनावर एका वर्षांसाठी 1 कोटी 4 लाख 82 हजार 456 इतका खर्च आहे. या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.