PCMC Revenue : प्राधिकरणातून महापालिकेत वर्ग केलेल्या मिळकतींना किचकट प्रक्रियेतून वगळा

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची पालिकेकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (PCMC Revenue )बरखास्त केल्यानंतर शासन निर्णयानुसार प्राधिकारणातील सर्व विकसित मालमत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वर्ग करण्यात आल्या आहेत. परंतु प्राधिकरणाचे पूर्वीचे मालमत्ता हस्तांतरण करतानाचे नियम, हस्तांतरण शुल्क, प्रशासकीय जे नियम होते, ते सर्व नियम कायम ठेवल्यामुळे मालमत्ता धारकांना किचकट प्रक्रियेतून जावे लागत आहे. किचकट प्रक्रिया वगळून ही संपूर्ण प्रक्रिया पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी सुलभ करावी, अशी मागणी  चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे यांनी केली आहे.

प्राधिकरण (PCMC Revenue) येथील सोसायटीधारक, फ्लॅटधारक, बंगलोधारक आणि फेडरेशन प्रतिनिधी यांची एक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या मालमत्ता हस्तांतरण करताना जी प्रक्रिया, हस्तांतरण शुल्क याबाबत जे नियम आहेत, तेच नियम सध्या प्राधिकारणाकडील मालमत्ता पिंपरी चिंचवड मनपाकडे वर्ग केलेल्या आहेत त्यांना असावेत. जे नियम पिंपरी चिंचवड मनपातील मालमत्ताना लागू आहेत तेच नियम आता प्राधिकारणातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग केलेल्या मालमत्ताना लागू करावेत. तेच नियम असावेत, यासाठी फेडरेशनकडून पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

प्राधिकारणातील मालमत्ता धारकांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे या बैठकीत ठरले. जर प्राधिकारणातील मालमत्ता हस्तांतरण करताना पूर्वीचे किचकट नियम व पूर्वीप्रमाणेच हस्तांतरण शुल्क भरावे लागत असतील तर मग या सर्व मालमत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेकडे वर्ग करून काय फायदा झाला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

याबाबत आमदार महेश लांडगे यांना स्वतंत्र निवेदन देणार असल्याचे संजीवन सांगळे म्हणाले. तसेच शासनस्तरावर देखील याचा पाठपुरावा (PCMC Revenue) करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.