PCMC : बसथांबे, बॅरिकेड्स दुरुस्तीसाठी 2 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – दापोडी ते निगडी या 12.50 किलोमीटर (PCMC) अंतराच्या मार्गावर दुहेरी बीआरटीएस मार्ग आहे. या मार्गावरील बसथांबे तसेच, बॅरिकेड्सची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटींचा खर्च महापालिका करणार आहे.

दापोडी ते निगडी आणि निगडी ते दापोडी असा हा मार्ग आहे. दोन्ही बाजूला बसथांबे आहेत. या बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. अवजड वाहनांनी धडक दिल्याने – थांब्यांचे छत तुटले आहेत. त्यांचे पत्रे चोरून नेले आहेत. तसेच, दरवाजे गायब झाले आहेत. बाके तुटली आहेत. बॅरिकेड्सचे लोखंडी अडथळे तुटले आहे. काही ठिकाणी ते गायब झाले आहेत. बसथांब्यावर ये-जा करण्यासाठी असलेले टेबल गतिरोधक अनेक ठिकाणी तुटले आहेत. काही थांबे भिकाऱ्यांचे आश्रयस्थान झाले आहेत.

Hinjawadi : कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, कार चालक मात्र पसार

तर, काही थांब्यांची महामेट्रोने दुरावस्था केली होती. मेट्रोच्या कामामुळे (PCMC) काही थांबे अनेक वर्षे धूळ खात पडून होते. शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांवरील बसथांब्यांची दुरवस्था झाल्याने शहर विद्रुप दिसत आहे. शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचत आहे. त्यामुळे हे थांबे व बॅरिकेड्स दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी 1 कोटी 93 लाख खर्च करण्यात येणार आहे. हे काम एच. सी. कटारिया या ठेकेदारास दिले आहे. या स्थापत्य प्रकल्प विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.